Share

किरीट सोमय्या घेणार पोलिसांकडे धाव; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे आक्रमक नेते किरीट सोमय्या हे राज्यात नेहमी चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. पवार कुटुंबीयांनी यांनी केलेल्या घोटाळ्याचे कागदपत्र मी ईडी आणि इन्कम टॅक्सला देणार आहे असा धमकी वजा इशारा सोमय्या यांनी दिला होता.

दरम्यान सोमय्या यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले ‘मी आज १ वाजता नवघर मुलुंड पूर्व पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला जाणार. १५ ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी माझ्या निवासी कार्यालयात महापालिका इंजिनिअर (आणि पोलीस) अर्धा डझन गुंडांना घेऊन आले, धक्काबुक्की, तोडफोड केली. माझ्या झेड सुरक्षा व्यवस्थेची छेडछाड केली, त्याची तक्रार मी दाखल करणार आहे’

दरम्यान किरीट सोमय्या हे नेहमी ठाकरे सरकारमधील  मंत्र्यांवर आरोप करत असतात. आता त्यांनी आपला मोर्चा महापालिका अधिकाऱ्यांकडे वळवला असल्याने आता या अधिकारांच्या अडचणीत वाढ होणार का ? हे पहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!