Share

आर्यन खानच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या नेत्याने सर्वोच्च न्यायालयात केली याचिका दाखल

Published On: 

नागपूर: क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला आर्यन खानच्या सुटकेसाठी वकिलांकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र तरी देखील त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढतचा आहे. त्यामुळे अभिनेता शाहरुख खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रसंगी बॉलीवूडच्या अनेक दिग्ग्ज कलाकारानी त्याला पाठींबा देखील दर्शवला. यानंतर आता आर्यन खानच्या सुटकेसाठी थेट शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ई-मेलद्वारे किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालया याचिका दाखल केली आहे. एकीकडे 3 हजार किलो ड्रग्ज मिळतात. मात्र मुंबई किंवा बॉलिवूडला धरून एनसीबी बदनामी करत आहे. त्यात काही लॉजिक काही निघत नाही. एनसीबी ही स्वतंत्र संवैधानिक संघटना असून आपल्या पदाचा गैरवापर करत आहे. आर्यनची केस ही शुल्लक केस आहे. त्यात काही रिकव्हरी, पजेशन नाही. आर्यनला 24 तासासाठी अटक करण्यात आली आहे. नंतर त्याला इंटरनॅशनल पेडलर ठरवलं गेलं. मग त्यात इंटरनॅशल रॅकेटही आलं. या सर्व ट्रायलच्या गोष्टी असून त्याला बेल मिळणे हा त्याचा राईट आहे, असं तिवारी यांनी सांगितलं. इतरांना जामीन होतो. त्याला 17 दिवसांपासून आत ठेवलं आहे, अशी अनेक मुद्दे त्यांनी आपल्या याचिकेत दिली आहे.

तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही किशोर तिवारी यांनी करत सांगितले की, एनसीबीने मूलभूत हक्कांचा भंग केला आहे. आर्यनचे मूलभूत अधिकार गोठवून ठेवले आहेत. सुट्टी आहे म्हणून त्याला पाच दिवस डांबून ठेवलं गेलंय, असं सांगतानाच झोनल अधिकाऱ्याचा बॉलिवूडमध्ये वेस्टेड इंट्रेस्ट आहे. त्यांची पत्नी सिनेमात काम करते. मॉडल आहे. हा माणूसही कलाकारासारखं काम करतो. हा सर्व त्यांचा दुराग्रह आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे भाजपच्या कार्यकर्त्यासारखे काम करतात. इतकेच काय तर वानखेडे यांची हकालपट्टी करावी आणि आर्यनला बेल मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!