मुंबई: देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र राजकारण तापले आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेना (Shivsena) देखील उतरली आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये (Shivsena in Uttar Pradesh) शिवसेनेच्या सात उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये आमच्या सात उमेदवारांचे नामांकन अर्ज बेकायदेशीरपणे रद्द केले. कागदपत्र योग्य दिली तरी सत्तेचा दुरूपयोग केला आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, ते तीनच्या आधी तिथे पोहोचले होते, तरी देखील त्यांचे नामांकन रद्द केलं. यासंदर्भात मी दिल्लीत जाणार आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला उत्तर प्रदेशात पाय ठेवू द्यायचा नाही. ऐकलं नाही तर निवडणूक अधिकारी त्यांनी त्यांच्या अधिकारांचा बेकायदेशीर वापर केलाय. गोव्यात प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याबाबतीतही तेच झालं. कुणाला तरी आमची भीती वाटतेय. उत्तर प्रदेशात उमेदवारांचे नामांकन रद्द केले. जिल्हाधिकारी ऐकत नाहीत, दबावात काम करत आहेत, ते शिवसेनेला घाबरले आहेत, हे लोकशाही नाही. आम्ही याबद्दल आवाज उठवणार आहोत, असं राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
‘एवढंच राहिलं होतं, देवालाही त्यांनी…’; जितेंद्र आव्हाडांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका
“कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल”, आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा हर्षवर्धन पाटलांकडून विरोध; आंदोलनाचा इशारा
राऊत, परबांविरुद्ध न्यायालयाचा अपमान केल्याची याचिका दाखल करणार-चंद्रकांत पाटील
‘ठाकरे’ सरकारमुळेच औरंगाबाद एलईडीच्या झगमगाटात उजळले-अंबादास दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

