🕒 1 min read
Kirit Somaiya | मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, यानंतर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. यासंदर्भात ट्विट करत पोलिसांनी आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केलं असल्याचा आरोप करत आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जात असतानाच भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अजून एका प्रकरणाचा उल्लेख करत आव्हाडांवर निशाणा साधल्याचं दिसत आहे.
ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड आज तथाकथित अन्यायाविरोधात ओरडत आहेत. अनंत करमुसे यांचे आव्हाड यांच्या पोलीस गुंडांनी अपहरण केले. मारहाण करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. आव्हाड या प्रकरणी माफी मागणार का?, असा सवाल किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.
#JitendraAwhad is SHOUTING today against so called injustice
Can he justify
Kidnapping, Beating of Anant Karmuse by Him & his Police Gundas !!?
Will He Apologies Beating of Karmuse !? @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 14, 2022
काय आहे प्रकरण?
जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड एका महिलेला ढकलताना दिसत आहेत. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. याबाबात सांगताना, काही वेळ मी बाजूला होते, कारण खूप गर्दी होती. साहेबांची निघण्याची वेळ होती, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना माझी अडचण आली, का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. ढकललं मला. आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते, असं संबंधित महिलेने म्हटलं आहे. मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “सरकारचं अति होतंय!” ; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवार संतापले
- Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांची आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “त्या महिलेची…”
- Ruta Awhad | जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच पत्नी ऋता आव्हाडांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- PM Kisan Yojana | PM किसान योजनेसंबंधित शेतकऱ्यांना ‘ह्या’ चुका पडू शकतात महागात
- Atul Bhatkhalkar । “ती महिला गप्प बसली असती तर लोकशाहीची मान उंचावली असती का?”; भातखळकरांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
