Share

Rohit Pawar | “सरकारचं अति होतंय!” ; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवार संतापले

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रिदा असगर रशीद यांच्या फिर्यादीवरून रविवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. आव्हाड यांच्याविरोधात आयपीसी कलम 354 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. दरम्यान राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

“सरकारचं आता अति होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकिय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे? ‘छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता’, स्व. अटलजींच्या या ओळी सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे नक्कीच लक्षात घेतील.”, असे रोहित पवार म्हणाले.

राजकीय लढाई इतक्या खालच्या स्तरावर महाराष्ट्रात गेली नव्हती, अशी खंत जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अशी परिस्थिती दिसत आहे. गुन्हा दाखल होण्याच्या काही तास आधी मुंख्यमंत्रीही त्या महिलेला भेटलेले दिसत आहेत. त्यामुळे हा गुन्हा त्यांनी स्वःतहून दखल घेतल्याने दाखल झालेला आहे असं दिसत असलं तरी या प्रकरणात चर्चा आणि बैठका होऊन कदाचित गुन्हा दाखल झालेला आहे किंवा त्यांना प्रवृत्त केलेलं असावं, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, आव्हाड यांना जाणूनबुजून टार्गेट करण्यात येत आहे. हे सरकार किती खूनशी प्रवृत्तीने काम करतंय. एखाद्या विरोधात काम करायचं म्हटल्यावर व्यक्तीगत जीवनात किंवा व्यक्तिगत स्तरावर जाऊन निंदा नालस्ती करण्याची व्यवस्था होतेय. आश्चर्य वाटतंय. आपल्या महाराष्ट्रात असं घडणं चुकीचं आहे, असं देखील जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!