मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. त्यामुळे एकप्रकारे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. यावरच चित्रपट ,कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (State President of Film, Arts and Cultural Department Babasaheb Patil) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
‘अभिनेते किरण माने यांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून काढले आहे. या झुंडशाहीविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. किरण माने यांनी स्वतःला एकटे समजू नये, त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस व संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने सन्मानाने परत मालिकेत घ्यावे ‘अन्यथा मुलगी झाली हो’ या मालिकेचे पुढील भाग चित्रीत होऊ देणार नाही, असा इशाराही बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे.
अभिनेते किरण माने यांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना @StarPravah वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून काढले आहे. या झुंडशाहीविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही – बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष,चित्रपट, कला व सांस्कृतिक विभाग pic.twitter.com/3jcYvJq2mw
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) January 14, 2022
शरद पोंक्षे, आरोही वेलणकर, कंगना राणावत, अनुपम खेर यांच्यासारखे कलाकार उघड-उघड भाजप समर्थनार्थ आपले मत मांडत असतात. अशावेळी त्यांना चित्रपट किंवा नाटकातून काढण्यात येत नाही. याउलट त्यांना पद्मश्री, एफटीआय मधील मोठी लाभाची पदे देऊन सन्मानित केले जाते.मात्र दिल्लीतील शेतकरी आंदोलन वा इतर सामाजिक आंदोलनांवर भाष्य केल्यानंतर किरण मानेंसारख्या एका हरहुन्नरी कलाकाराला अशी वागणूक दिली जाते हे अशोभनीय आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यांनी काय बोलावे, काय लिहावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशा वेळी कुठलीही वाहिनी वा कंपनीने कलाकारांच्या वैयक्तिक जीवनातील मतप्रवाहांचे राजकारण करून एखाद्या कलाकाराची उपजीविका हिरावून घेणे, ही बाब अन्यायकारक व निंदनीय आहे. सांस्कृतिक क्षेत्र हे जनजागृतीचे एक उत्तम माध्यम आहे. अशावेळी प्रत्येक कलावंताची किंवा प्रत्येक व्यक्तीची मते वेगळी असू शकतात. त्याच्या वैयक्तिक मतासाठी अशा प्रकारचे कृत्य करणे म्हणजे हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आहे, असे मत बाबासाहेब पाटील यांनी मांडले आहे.
नेमके प्रकरण काय?
अभिनेते किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” अशा आशयाची ही पोस्ट होती. यानंतर किरण माने यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे. आता यावरच अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेद्वारा घराघरात पोहचले. मात्र त्यांच्या लेखणीमुळेही ते सोशल मिडीयावर प्रसिद्ध आहेत. राजकीय घडामोडींवर ते नेहमीच आपली भूमिका मांडत असतात. मात्र यावेळी केलेल्या पोस्टमुळे त्यांना मालिकेतून काढले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना आता दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शिल्पाची लाडकी लेक समिशाने जखमी कावळ्याला बघून जोडले हात ; व्हिडिओ व्हायरल
- “खासदार इम्तियाज जलील बेईमान”; संजय राऊत यांची टिका..!
- “महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही,स्टार प्रवाहने चूक सुधारावी” बाळासाहेब थोरातांचा इशारा
- “मला विरोध करणारे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, तुकाराम महाराजांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तीचे”, किरण मानेंची तटस्थ भूमिका
- अर्जुनसोबत ब्रेकअपच्या बातम्यानंतर मलायकाची पोस्ट, म्हणाली..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

