मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa shetty) फिटनेसबद्दल सतत चर्चेत आहे. तसेच सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमाने चाहत्यांशी संवाद साधत असते. शिल्पाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिची लाडकी लेक समिशाला (Samisha) भूतदयेचे धडे देत असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान शिल्पा शेट्टीने आपल्या इन्साग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिची लाडकी लेक समिशाला प्राण्यावर प्रेम करायला शिकवताना दिसतेय. शिल्पाच्या घराजवळील अंगणात एक कावळा जखमी अवस्थेत दिसतोय. हे बघून समिशाला जखमी कावळ्यासाठी प्रार्थना करायला सांगताना दिसतेय. यावेळी तिने समिशाला हा जखमी कावळा लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी ‘ओम साई राम’ म्हणायला सांगितलं. तसंच ती ‘गेट वेल सून बर्डी’ , (‘Get Well Soon Birdie’) असं म्हणायला सांगताना दिसतेय. या व्हिडिओत आई शिल्पाचं म्हणणं ऐकत समिशानेही हात जोडलेले दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/tv/CYoZMrIBvOQ/?utm_source=ig_web_copy_link
शिल्पा शेट्टीने समिशाला प्राण्यावर प्रेम करायला शिकवताना दिसतेय. जखमी कावळ्यासाठी मुलीला प्रार्थना करायला लावून प्राण्यांबद्दल प्रेम, अस्था शिकवित असल्याने हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला आहे. विशेष म्हणजे समिशानेही हात जोडल्याने ती खूप क्यूट दिसतेय. या पोस्टमध्ये शिल्पाने म्हटलंय, ‘समिशा अजून दोन वर्षांची देखील झालेली नाही. तरी ती या कावळ्यासाठी प्रार्थना करतेय. मुलं सहृदयी असतात. ते निर्मळ मनाने प्रार्थना करतात. समिशाने मोठं झाल्यावरही या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एवढीच अपेक्षा.’ सोबतच तिने या कावळ्याचा जीव वाचवल्याबद्दल पेटा संस्थेचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडिओ मात्र प्रचंड व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे- चंद्रकांत पाटील
- “शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चाललाय”
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर राऊतांचे भाष्य; म्हणाले,‘कधी काळी पंतप्रधानही…’
- “चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं”, राऊतांचा हल्लाबोल
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र


