नवी दिल्ली- आपल्या दमदार अभिनयाने सिनेजगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तामिळनाडूतील काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. सोमवारी खुशबू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला होता.
दरम्यान,भाजपामध्ये प्रवेश करताना खुशबू सुंदर यांनी काँग्रेसवर टीका करताना मानसिक संतुलन ढासळलेल्यांचा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. आपल्या या वक्तव्यावरुन खुशबू सुंदर यांनी माफी मागितली आहे. अयोग्य शब्दांचा वापर केल्याप्रकरणी त्यांनी फक्त माफी मागितलेली नसून भविष्यात पुन्हा असं होणार नाही अशी हमी दिली आहे.खुशबू सुंदर यांच्या वक्तव्याविरोधात तामिळनाडूमधील जवळपास ३० पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
दरम्यान,अभिनय कारकीर्दीला अलविदा करत खुशबू यांनी मे २०१० मध्ये डीएमकेत प्रवेश करून सक्रीय राजकारणाला सुरुवात केली होती. २०१४ साली एम. के. स्टॅलिन यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी डीएमकेला रामराम ठोकला. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
त्यांनी 2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेस पक्षच देशातील नागरिकांचं भलं करू शकतो, काँग्रेसमध्ये आल्यानंतर मला घरी आल्याचा आनंद होत आहे. असं त्या म्हणाल्या होत्या. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं खुशबू यांना तिकीट नाकारलं होतं.
तामिळनाडूमध्ये खुशबू सुंदर यांचे चांगले राजकीय वजन आहे. त्याचा भाजपला पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकते. भाजप त्यांना स्टार प्रचारक म्हणून पुढे आणू शकते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुंदर ह्या कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या.
महत्वाच्या बातम्या-
- परतीच्या पावसाने पुण्याला झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी शिरलं
- विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठीही होणार ठाकरे-कोश्यारी संघर्ष ?
- मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ
- जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; मुंबईत आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

