🕒 1 min read
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाने त्यांच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या मोहिमेला रविवारी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून सुरुवात केली आहे. भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन करत विजयाने मोहिमेची सुरुवात केली. परंतु सामन्यानंतर या दोन्ही संघामध्ये अगदी प्रेमाचे संबंध दिसले. पाकिस्तानच्या कर्णधार बिस्माह मारुफची मुलगी फातिमा हिने भारतीय क्रिकेटपटूंची मने जिंकली. भारतीय खेळाडू तिच्या सोबत मस्ती करताना फोटो काढताना दिसल्या.
भारतीय महिला खेळाडूंचा पाकिस्तानी कर्णधारच्या (bismah maroof) मुलीसोबत मस्ती करतानाच व्हिडीओ हि व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हरमनप्रीत कौर harmanpreet kaur) आणि स्मृती मंधाना (smriti mandhana) सोबत इतर खेळाडूही लहानग्या फातिमाला हसवायचे प्रयत्न करताना दिसत आहे. या दोन्ही संघातील वैर तर अनेक वर्षांचा इतिहास आहे मात्र काल घडलेल्या या गोड घटनेने प्रत्येकाचे मन आनंदित झालेले दिसले.
Little Fatima's first lesson in the spirit of cricket from India and Pakistan ???????? #CWC22
???? @TheRealPCB pic.twitter.com/ut2lCrGL1H
— ICC (@ICC) March 6, 2022
Bismah Maroof's legacy will go far beyond her achievements on the field. In a society that often tells women to make choices between career and family, she's showing that you can have both! Such an inspiring person.https://t.co/Vp7EB2iwKd
— Aatif Nawaz (@AatifNawaz) March 6, 2022
भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करण्याचा विक्रम कायम ठेवला. भारतने पाकिस्तानवर १०७ धावांनी मात केली. दोन्ही संघात झालेल्या मागील सर्व १० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. भारतीय संघाकडून स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकरने अप्रतिम अर्धशतकीय खेळी केली तर राजेश्वरी गायकवाडने चार विकेट्स घेत भारताच्या विजयात मुख्य भूमिका बजावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…तर राष्ट्र्वादीचे नेते राज्यात कसे फिरतात हे पाहू”, ‘त्या’ घटनेवरून नितेश राणेंचा इशारा
- IPL 2022: आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर ; वाचा कोणत्या तारखेला कोणाचा सामना!
- ‘ऑपरेशन गंगा’चा खुळखुळा थांबवा- संजय राऊत
- आता घरीच करा स्वस्त आणि मस्त कॅरेटिन ट्रीटमेंट
- ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच चर्चेत; चाहत्याने पती अभिषेक बच्चनकडे केली तक्रार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
