Share

‘ज्या व्यक्तींना तात्काळ गरज नाही अशा लोकांनी देखील रेमडेसिवीर इंजेक्शन घेवून ठेवली’

Published On: 

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणार तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला आहे.

रेमडीसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली असताना सुध्दा उपलब्ध होत नाही.नेमका काळाबाजार कसा होतोय किंवा काय कारवाई सरकार करतेय याबाबत कोणतीही स्पष्टता होवू शकत नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर आल्याने नातेवाईकांची होत असलेली वणवण आणि लूटमार थांबविण्यासाठी शासनानेच कडक पावले उचलावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनकरता लांबच्या लांब रांगा लावत आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा आणि रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा, अशी मागणी आता नातेवाईक करत आहेत.

नाशिकमध्ये आज सकाळी रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने आंदोलन केले. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवा, अशी मागणी देखील केली. याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारणा केली असता, ‘ज्या व्यक्तींना तात्काळ गरज आहे, अशा व्यक्ती रांगेत उभ्या राहतात. तसेच ज्या व्यक्तींना तात्काळ गरज नाही तेही उभे राहत आहेत. त्यांना डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेले असते, परंतु त्यांना त्याची तात्काळ गरज नसते. मात्र, तरी देखील अनेक नागरिक रांगेत उभे राहतात असे त्यांनी म्हटले आहे.

काही डॉक्टर, खासगी रुग्णालयाचे लोक, काही पैशेवाले लोक तर काही, असे लोकही रांगेत होते ज्यांना चिठ्ठीत काय लिहिले आहे हे देखील माहिती नव्हते. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन हवे की नको हे डॉक्टर ठरवणार. त्यामुळे चिठ्ठीशिवाय कोणालाही आता रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येणार नाही’, असे भुजबळांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!