मुंबई : राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार यावर आता शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातचं आता भाजपकडून प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रकांत बावनकुळे यांना डच्चू देण्यात आला आहे.
तर ज्येष्ठांच्या गच्छंतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवार घोषित केले. चारही जणांनी अर्ज भरले. भाजपमध्ये राज्याने इच्छुकांची नावे पाठवणे, केंद्राने दिलेला निर्णय पाठवणे, दिल्लीत उमेदवार पार्शवभूमी सांगितली जाते. त्यामुळे उमेदवारीबाबत केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे. त्यांनी आगामी काळात विचार केला असेल.
तसेच एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल. हे सगळे इतके चांगले कार्यकर्ते आहेत हे तिघेही समजूतदार असतील, ते स्वतःच स्वतःला समजावून सांगतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान पक्षाने निष्ठावंतांना डावलून, बाहेरुन आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीच केला आहे. खडसेंनी स्वत:साठी उमेदवारी मागितली होती. मात्र तिकीट न मिळाल्याने खडसे चांगलेच संतापले आहेत.
महत्वाच्या बातम्या
दारूविक्री करताना होम डिलिव्हरीचा विचार करा, सर्वोच्च न्यायालयाच्या राज्य सरकारांना सूचना
करमाड रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख : मुख्यमंत्री
चार दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारने वाढला, मुंबईची परिस्थिती चिंताजनक !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

