Share

दारूविक्री करताना होम डिलिव्हरीचा विचार करा, सर्वोच्च न्यायालयाच्या राज्य सरकारांना सूचना

Published On: 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दारू विक्री घरपोच करावी अशा सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दारू विक्रीस परवानगी दिली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयात काही संभ्रम असल्याने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी राज्य सरकारांना दारू विक्रीबाबत सूचना केली.

ते म्हणाले की, सर्व राज्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचं पालन होण्यासाठी कोणताही संपर्क न होता दारू विक्री करण्याचा अर्थात होम डिलिव्हरीचा विचार करावा,” असे सूचना केली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात शासनाने जीवनावश्य असलेल्या व जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकानं खुली करण्यास परवानगी दिली होती. यात दारूविक्री करण्यालाही परवानगी देण्यात आली. मात्र, या निर्णयानंतर देशभरात सगळीकडे दारु खरेदीसाठी लोकांच्या रांगा लागल्यानं करोना प्रसाराचा धोका निर्माण झाला.

यासाठीच सरकारनं काढलेल्या आदेशात स्पष्टता नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दारुविक्री संदर्भातील आदेशात स्पष्टता असावी. त्याचबरोबर सोशल डिस्टसिंगचं पालन केलं जावं, अशी मागणी केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं कोणतेही आदेश देण्यास नकार दिला. “आम्ही कोणताही आदेश देणार नाही. पण, सर्व राज्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियम आणि निर्देशांचं पालन व्हावं, यासाठी अप्रत्यक्ष विक्री अर्थात होम डिलिव्हरीचा विचार करावा, अशी सूचना न्यायालयानं राज्यांना केली आहे.

महत्वाच्या बातम्या

राज्यातील विद्यर्थ्याना दिलासा, अंतिम सोडून पदवीच्या अन्य परीक्षा रद्द

विधान परिषदेवर भाजपकडून ‘या’ 4 नेत्यांना संधी, तर तावडे-मुंडे-खडसेंना डच्चू

करमाड रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख : मुख्यमंत्री

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!