मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा आता 50 हजारवर गेला आहे. तर गेल्या चार दिवसात देशात रुग्णांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचं म्हंटल जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही कोरोनाबाधितांचा आकडा हा वेगाने वाढत आहे.
मागील चार दिवसात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. चार दिवसांमध्ये रुग्णांची संख्या ४०,००० वरून थेट ५०,००० इतकी झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं काळजीची बाब म्हणजे यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत.
देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आज ५६ हजारांवर पोहोचली आहे. करोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच करोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत आहे.त्यात आता करोनाच्या प्रसार वेगाने होत असल्याचं दिसून आलं आहे. मागील चार दिवसांच्या आकडेवारीनं नवं आव्हानं सरकारसमोर उभं राहिलं आहे.
३ ते ६ मे या चार दिवसांच्या कालावधीमध्ये रुग्णांच्या संख्येनं उसळी मारल्याचं दिसून आलं. या चार दिवसांमध्ये तब्बल दहा हजार जणांना करोना झाल्याचं समोर आलं. त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४०,००० वरून थेट ५०,००० इतकी झाली. यात सात राज्यांमध्ये ३००० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
चीनने गंभीर चूक केली आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेसिडेंट ट्रम्प पुन्हा भडकले
कोरोना टाळण्यासाठी सांगलीतील एका संघटनेची दारू घरपोच देण्याची तयारी
न्यायव्यवस्था ही काही श्रीमंत-शक्तीशाली लोकांच्या मुठीत : न्यायमूर्ती गुप्तांंचे रोखठोक विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

