Share

केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Published On: 

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. याआधीही शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केतकी चितळे हिने केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे हिने केलेली. यानंतर केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी रविवारी १५ मे रोजी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात तिला हजर करण्यात आले होते. यानंतर सत्र न्यायालयाने ३ दिवसांची म्हणजेच १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज याचा निकाल समोर येत आहे.

केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला आज बुधवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाणार आहे. यावेळी केतकी चितळे हिच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी केतकी चितळे हिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता संबंधित ठिकाणच्या पोलिसांकडून केतकी चितळे हिचा ताबा मागितला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतकी चितळे आणखी काही काळ तरी न्यायलयीन कोठडीत राहण्याची दाट शक्यता आहे.

नऊ ठिकाणी गुन्हे दाखल –

आतापर्यंत एकूण नऊ ठिकाणी केतकी चितळेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ मे ला मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात तसेच नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!