Share

११ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणासंदर्भात CBI ने घेतली पी. चिदंबरम यांची झडती

Published On: 

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांची  ११ वर्षे जुन्या एका आरोपाप्रकरणी झडती घेण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला असून पी. चिदंबरम यांच्या राष्ट्रनिष्ठेवर कुणीही अविश्वास दर्शवू शकत नाही, असे काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

दरम्यान ११ वर्षांपूर्वी एक वीज कंपनीसाठी २६३ चिनी नागरिकांना व्हिसा प्राप्त करून दिला असल्याचा आरोप पी. चिदंबरम आणि कीर्ती चिदंबरम यांच्यावर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांच्यावर हा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणीच सीबीआयने मंगळवारी पी. चिदंबरम आणि कीर्ती चिदंबरम यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकत झडती केली आहे.

तर पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात ट्वीट करत म्हटले आहे की, “आज सकाळी सीबीआयच्या पथकाने माझ्या चेन्नई येथील निवासस्थानाची आणि दिल्लीतील माझ्या अधिकृत निवासस्थानाची झडती घेतली. टीमने मला एक एफआयआर दाखवला ज्यामध्ये माझे नाव आरोपी म्हणून नाही. शोध पथकाला काहीही सापडले नाही आणि काहीही जप्त केले नाही. मी निदर्शनास आणू शकतो की शोधाची वेळ मनोरंजक आहे.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!