Share

‘हे तर काहीच नाय’ च्या मंचावर केशव उपाध्येंची हजेरी; स्टॅण्ड अप कॉमेडीने जिंकले प्रेक्षकांचे मन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते तथा प्रवक्ते केशव उपाध्ये नेहमीच विविध प्रश्नांवरून सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत असतात. रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केशव उपाध्ये (BJP Leader Keshav Upadhye) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत.

केशव उपाध्ये यांनी झी मराठीवरील ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमाला हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी या मंचावर स्टॅण्ड अप कॉमेडी करत प्रेक्षकांचे तसेच कार्यक्रमातील परीक्षकांचेही त्यांनी मन जिंकले आहे. याचाच एक व्हिडिओ केशव उपाध्ये यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते राजकीय घडामोडींवर स्टॅण्ड अप कॉमेडी करताना दिसून येत आहेत.

‘हे तर काहीच नाय’ हा कार्यक्रम झी वाहिनीवर शुक्रवार- शनिवार असतो. अभिनेता सिद्धार्थ जाधव यामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. यावेळी भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केलेल्या स्टॅण्ड अप कॉमेडीवर सिद्धार्थसह प्रेक्षकही हसताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. राजकीय प्रवासात उपाध्ये यांचे हे रूप सर्वांनाच आश्चर्याचे ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!