🕒 1 min read
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे धक्कादायक आरोप केले होते, त्यानंतर या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात सहा महिन्यांत समितीला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, भाजपने या मुद्द्यावारून सरकार टीका केली आहे.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन केली आहे. मात्र राज्य सरकारने 1 एप्रिलच्या 2 दिवस आधीच जनतेला अक्षरश: एप्रिल फूल बनवले आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.परमबीर सिंग उच्च न्यायालयात गेल्यामुळे राज्य सरकारने बुधवारी कैलास चांदीवाल समिती स्थापन केली. ही समिती, चौकशी आयोग अधिनियम, १९५२ अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहिलेच पाहिजे असे बंधनही नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे,’ अशी टीका उपाध्ये यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते – नितेश राणे
- आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय
- ‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- बंडखोरांनी अवताडे-भालकेंची डोकेदुखी वाढवली, पंढरपूर पोटनिवडणुकीतील चुरस वाढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

