Share

बंडखोरांनी अवताडे-भालकेंची डोकेदुखी वाढवली, पंढरपूर पोटनिवडणुकीतील चुरस वाढली

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके याच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.एका बाजूला भाजपने तगडा उमेदवार दिला आहे तर दुसऱ्या बाजूला बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक शैला गोडसे यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी सातत्याने वाढत चालली आहे.

शैला गोडसे यांनी या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी देत तिरकी चाल खेळण्यात आली आहे. या दोन उमेदवारांच्या झंजावाती प्रचारामुळे भगीरथ भारत यांच्या अडचणी वाढल्या आहेत असे चित्र आहे.

शैला गोडसे या गेल्या निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारल्याने यंदा त्यांनी बंडाचा झेंडा फडकावीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाड्यावस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.दरम्यान,आता शिवसेनेकडून गोडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान,स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील या नेत्याने बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरच्या भाजप पुरस्कृत नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे  यांनीही भाजप विरोधात एल्गार पुकारला आहे. यामुळे  भाजपचे समाधान अवताडे यांच्यासाठी देखील ही लढाई सोपी नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!