मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आज मुख्यमंत्री भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता भूमिपूजन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, स्मारक समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. या मुद्यावरून आता भाजपाचे नेते आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते.’ अशी टोला त्यांनी लगावला आहे.
आज मा. बाळासाहेब असते तर,
पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते.मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस !
राजा होण्यासाठी मन मोठं लागतं,
त्यांच्यानंतर…
फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 31, 2021
निलेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना चांगलच सुनावलं आहे. ‘नितेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत.’ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नारायण राणेंनी सहकुटुंब ब्रीच कँडीमध्ये जाऊन केली शरद पवारांची विचारपूस
- मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी केले रोहित-विराटमध्ये पॅचअप
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- गृहमंत्र्यांकडून त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सातत्यानं फोर्सवर दबाव टाकला जात होता, परमबीर सिंहांची कोर्टात माहिती
- दीपालीच्या चव्हाण प्रकरणात एमएस रेड्डी यांना सहआरोपी करण्याची मागणी का होतेय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

