🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका मांडताना दिसून येत आहेत. यावर शिवसेनेकडून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही प्रतिकिया देत टीका केली आहे.
“मनसेने घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात अशांतता निर्माण होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. राज्य सरकारने कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी राज्यात काही ठिकाणी धरपकड केली आहे. राज्याचे पोलिस प्रशासन आपल्या जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत.”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
मनसेने घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात अशांतता निर्माण होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. @ChhaganCBhujbal यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. #Loudspeakers pic.twitter.com/JC4JCJU4IN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 4, 2022
तसेच राज ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या व्हिडीओचा दाखला देत आज नव्याने राजकारण तापविण्याचे काम केले. मात्र बाळासाहेबांच्या त्या भाषणानंतर १९९५ सालामध्ये शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त राज ठाकरे क्रियाशील होते. त्यावेळी राजसाहेबांनी दुसरं काही करण्यापेक्षा त्यात लक्ष घातलं असत तर बाळासाहेबांचा शब्द पाळता आला असता, असा टोला भुजबळ यांनी राज ठाकरेंना लगावला. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याची भूमिका प्रत्येकाने घ्यायला हवी, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
दरम्यान राज ठाकरेंनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये “ज्यादिवशी आमचे सरकार महाराष्ट्रात येईल, त्यादिवशी आम्ही रस्त्यावरील नमाज पढणे बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो, जो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. हिंदू धर्माचा कुठे उपद्रव होत असेल त्यांनी आम्हाला येऊन सांगावे, आम्ही बंदोबस्त करूत. माशिदिवरील लाऊडस्पीकर खाली येतील.”, असे बाळासाहेब ठाकरे म्हणताना दिसून येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 CSK vs RCB : एक मॅच विक्रमांची..! धोनीला आज एक-दोन नव्हे, तर ‘इतके’ विक्रम करण्याची सुवर्णसंधी; वाचा!
- प्रसिद्ध असलेली भेंडवळची भविष्यवाणी जाहीर!
- रोहितच्या टीम इंडियाचा ‘मोठा’ पराक्रम; आयपीएलदरम्यान ICCनं दिली खुशखबर!
- हिंदू – मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन, एकत्र केल नमाज व हनुमान चालीसा पठण
- “मनसैनिकांना धरपकड कशासाठी?”; राज ठाकरेंचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
