Share

BJP | “तुमच्या दसरा मेळाव्यातील भाषणासाठी काही मुद्दे…”; भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला

Published On: 

मुंबई :  सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये एकमेकांवक आरोप, टोलेबाजी करण्याची चढाओढ लागली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये ?

उद्धव ठाकरे, आज शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का?, असा खोचक सवाल करत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, तुमच्या सत्ताकाळात वसुलीबाज वाजेसारख्यांच्या कारवायांमुळे हजारो नागरिकांचे खिसे कापून पैसा लुबाडला गेला. हे खोके कोणाकडे गेले याचे गुपित आज उघड करणार का?.

लाकुडतोड्याच्या कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण?

अडीच वर्षांत तुम्ही महाराष्ट्रासाठी केलेली किमान दहा कामे दाखवू शकाल का? ज्यामुळे तुमच्या सत्तेचा जनतेला थेट फायदा झाला?, असा थेट सवाल उपाध्ये यांनी ठाकरेंना केला आहे. त्याचबरोबर पुढे त्यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटलं आहे की, लाकुडतोड्याच्या कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण?. आता शरद उपाध्ये यांनी केलेल्या टीकेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

तसेच, दोन दसरा मेळावे होत असल्यामुळे गर्दीचे प्रमाण देखील खूप असेल, अशावेळी शिवसेनेतील दोन गटांमध्ये शांततेचं वातावरण राहिल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले, दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार असल्याने मुंबईतल्या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली जातेय. या काळात समाज कंटकांनी स्थिती अस्थिर करू नये, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!