मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅम्पटन येथे दाखल झालेले आहे. मात्र सामन्याच्या एक दिवस आधी न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन बद्दल एक नविन माहिती समोर आली आहे.
डब्ल्युटीसी सामन्यापुर्वी आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. या कसोटी क्रमवारीत यापुर्वी पहिल्या क्रमांकावर केन विल्यमसन होता. मात्र १६ जुन रोजी आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत केन विल्यमसनने पहिले स्थान गमावले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने विल्यमसनला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. आयसीसी क्रमवारीत स्टिव्ह स्मिथचे गुण हे ८९१ आहेत. तर केन विल्यमसनचे गुण ७७६ इतके आहेत.
या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन हा ८७८ गुणासंह आहे. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या क्रमवारीत ८१४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. विराट कोहली व्यतिरिक्त या क्रमवारीत भारताचा सलामीवीर रोहीत शर्मा आणि रिषभ पंत हे आहे. रोहित आणि रिषभ दोघेही ७४७ गुणासंह संयुक्त सहाव्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्यूटीसी फायनलमध्ये सिराज का इशांत ? ; सचिनने दिले ‘हे’ उत्तर
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- ‘…तरच मला टी-२० क्रिकेटमध्ये संधी मिळू शकेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण

