नवी दिल्ली- दिल्लीत काही आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यावर नियंत्रण आणण्यात यश मिळाल्याचा दावा दिल्ली सरकारकडून करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीत कोरोना साथीच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धामध्ये भाजपच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. भाजपबरोबरच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कॉंग्रेसचे आभार मानले आहेत.
दरम्यान, देशातला कोविड 19 चे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारला असून तो आता 63 पूर्णांक 24 शतांश टक्क्यांवर गेला आहे. आत्तापर्यंत एकूण 5 लाख 92 हजार 32 रुग्ण देशभरात बरे झाले असून, गेल्या 24 तासात, 20 हजार 572 रुग्ण बरे झाले आहेत.
उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 19 हजार 840 इतकी आहे. गेल्या 24 तासात 29 हजार 429 नव्या कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 9 लाख 36 हजार 181 वर पोहोचली.
देशातला कोविड-19 रुग्णांचा मृत्युदर 2 पूर्णांक 60 शतांश टक्के झाला आहे. 30 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातला हा मृत्यू दर देश पातळीवरील दरापेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासात एकूण 3 लाख 20 हजार 161 कोरोना चाचण्या विविध प्रयोग शाळांमधून करण्यात आल्या आहेत.
आत्तापर्यंत एका दिवसात केलेल्या चाचण्यांचा हा सर्वाधिक आकडा आहे. 865 सरकारी आणि 358 खाजगी प्रयोगशाळांमधून आत्तापर्यंत 1 कोटी 24लाख 12 हजार 664 चाचण्या करण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या-
अखेर ‘तो’ निर्णय रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला
मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ, वॉरन बफेंना मागे टाकत पोहचले ‘या’ क्रमांकावर
एका लग्नामुळे ७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन, तर नवरदेवाला २५ हजारांचा दंड!
‘या’ तारखेपासून होणार मराठा आरक्षणवर नियमित सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

