Share

आईसमोर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरत, मित्रानेच केली हत्या

Published On: 

औरंगाबाद : किरकोळ वाद झाल्यानंतर मित्रानेच आईसमोर शिवीगाळ केल्याचा मनात राग धरत, तरुणाची हत्या केल्याची घटना, संजयनगर सी-७ गल्लीच्या कोपऱ्याजवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मंगेश दिनकर मालोदे वय – २८, रा संजयनगर असे मयत तरुणाचे नाव आहे. तर विशाल उर्फ अरबाज अहेमद शेख वय- २३ रा. कैलासनगर असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश आणि विशाल उर्फ अरबाज हे दोघे मित्र असून दोघेही सोबत नशा करीत होते.  मंगेश मजुरी करून त्याचा उदरनिर्वाह करायचा. काही दिवसांपूर्वी दोघात वाद झाला होता. परंतु नंतर माफी मागून तो मिटला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी मंगेशने विशाल उर्फ अरबाजला कोणत्यातरी कारणाने त्याच्या आईसमोर शिवीगाळ केली. त्याच्याच राग विशाल उर्फ अरबाजने मनात धरला. त्यानंतर त्याने गुरुवारी रात्री मंगेशला संजयनगर सी-७ गल्लीच्या कोपऱ्याजवळ फोन करून बोलवून घेतले.
त्यानंतर दोघात पुन्हा वाद झाला, विशाल उर्फ अरबाज याने स्वतःजवळ असलेला चाकू काढत, मंगेशवर सपासप वार केले. आणि मंगेश तिथेच कोसळला त्यानंतर विशाल उर्फ अरबाज घटनास्थळावरून निघून गेला. घडलेला प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत तपासला सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांना आरोपीची माहिती मिळताच पावणे अकराच्या सुमारास विशाल उर्फ अरबाजला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी मयत मंगेशचा भाऊ उमेश याने जिंसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघे ही नशेच्या सवयीचे
आरोपी विशाल उर्फ अरबाज आणि मयत मंगेश हे दोघे ही सोबत नशा करीत असत, तसेच आरोपी विशाल उर्फ अरबाज याची संजयनगर, कैलासनगर भागात दहशत होती. नशेसाठी तो कोणालाही अडवून मारहाण करीत होता. त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहे. किरकोळ वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांसह स्थानिकांनी वर्तवला.
घटनास्थळी रक्त तसेच सांडलेले
संजयनगर सी-७ गल्लीच्या कोपऱ्याजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास हत्येची घटना घडली. पहाटे पर्यंत पोलीस घटनास्थळी होते. पंचनामा झाल्यानंतर पोलीस तेथून निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पडलेल्या रक्तावर साधी माती टाकली नाही. यावरून स्थानिकांनी पोलिसांवर रोष दाखवला. शुक्रवारी सकाळी दहा पर्यंत रक्ताचे लोण तसेच रस्त्यावर पडून होते. येणाऱ्या जाणाऱ्यांना पडलेले रक्त पाहून धडकी भरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!