लातूर: महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मोडेल पण वाकणार नाही, ही महाराजांनी आम्हा मावळ्यांना दिलेली शिकवण आहे. त्यामुळे केंद्राने ईडी-सीबीआयचा गैरवापर केला आहे. हे सर्वसामान्य जनतेला कळले. फक्त गैरभाजप राज्यांना त्रास देणाऱ्या महाराष्ट्रद्वेशी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा. असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी केले.
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका या विधानसभा व लोकसभा निवडणुकीची नांदी आहे. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, असे प्रतिपादन मराठवाडा संपर्कनेते चंद्रकांत खैरे यांनी केले. नगरपंचायत निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुुढे म्हणाले, भाजपकडे काळा पैसा प्रचंड प्रमाणात जमा झाला आहे. ते पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची भाषा करत आहेत. हा प्रचंड पैसा कुठून आला, याचा जाब जनतेने भाजपला विचारावा. शिवसेना ही संघटना जनतेच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी सतत धडपड करत असते.
कोरोनाकाळात फक्त आणि फक्त शिवसेना व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला. भाजप नेते घरात लपून बसले होते. भाजपचे आमदार, खासदार यांनी कोरोनाकाळात महाराष्ट्र राज्य सरकारला आर्थिक मदत न करता केंद्राच्या तिजोरीत पैसा जमा केला. केंद्रातील मोदी सरकार २०१४ ला सत्तेत येण्यापूर्वी गोरगरीब जनतेला जनधन खात्यावर पैसे टाकतो, म्हणाले होते. पण तो शब्द पाळला नाही. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शिवाजी माने, नामदेव चाळक आदींसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- केएल राहुल आणि राशिद खान लखनऊ संघात होणार सामील!
- …हा शहाणपण जमल्यास स्वपक्षीय राजू नवघरे आणि नवाब मलीकला सांगा- अतुल भातखळकर
- “माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले”
- आर अश्विन मुरलीधरनचा 800 कसोटी बळींचा विक्रम मोडू शकेल का?
- ”अजित पवारांनी त्यांचा राखीव सूट अमित शहांना देऊन महाराष्ट्राच्या संकृतीचे दर्शन दिले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

