परभणी : जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी जांब येथे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करत सीमोल्लंघन करून समाजासमोर आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लोक गावात सीमोल्लंघन करतात, एकमेकांना भेटतात परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी कोरोनाला हरविण्यासाठी परभणी तालुक्यातील जांब या गावामध्ये लसीकरण राहिलेल्या घरोघरी जाऊन शंभर टक्के लसीकरण पूर्ण करूनच सीमोल्लंघन व दसरा सण साजरा केला.
गावामध्ये एकूण उद्दिष्ट असलेल्या ३४०१ एवढ्या नागरिकांचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण झाला आहे तर दुसरा डोस १३५६ नागरिकांना देण्यात आला आहे. सीईओ टाकसाळे हे ज्या गावामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा गावात आरोग्य विभागाच्या पथकासह दाखल होत आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबाला व्यक्तिशः भेटून जागच्या जागी लसीकरण करत आहेत. यात गावात शेतात काम करणारे शेतमजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मिळेल त्या ठिकाणी लसीकरणाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. त्यामुळे या मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जांब येथील लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद जुनेद अहमद, सीडीपीओ (प्रकल्प एक) अरविंद आकात, सरपंच रामेश्वर रेंगे यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही’, सोनिया गांधींचा स्वपक्षीय नेत्यांना टोला
- राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; दानवेंचा घणाघात
- ‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

