Share

एट्रॉसिटीसह अवैध बंदुकीचा गुन्हा, करुणा शर्मांना कोर्टात हजर करणार

Published On: 

बीड : करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम ३०७ आणि एट्रोसिटी कायद्याखाली करुणा शर्मासह आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. काल त्यांना अटक करण्यात आली. आज सोमवारी त्यांना अंबाजोगाई कोर्टात नेण्यात येत आहे

रविवारी करुणा शर्मा यांनी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. म्हणून शर्मासह मोरे यांच्या विरोधात एट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहनात पिस्तुल सापडल्याच्या आधारावर गाडी चालक दिलीप पंडित अंदेरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी कालच त्यांना परळीतून ताब्यात घेऊन अटक केली होती. आता करुणा शर्मा यांना परळी शहर पोलीस ठाण्यातून न्यायालयात अंबाजोगाईला घेवून जात असल्याची माहिती आहे.

करुणा शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत परळीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत आपण आपले पती व इतरांच्या विरोधात अनेक पुरावे सादर करून काही गोष्टींचा व षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते.

त्यानूसार करुणा शर्मा या रविवारी दुपारी परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शन घेऊन जात असतांनाच त्यांची मंदिर परिसरात काही महिलांशी बाचाबाची झाली. यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका महिलेने शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानूसार पोलिसांनी करुणा शर्मा यांच्याविरोधात एट्राॅसिटी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. करुणा यांना पोलिसा ठाण्यात नेत असतांनाच पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली. तेव्हा कारच्या मागच्या बाजूला पोलिसांना एक गावठी पिस्तुल देखील आढळून आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!