Share

जेलमधून बाहेर आल्यावर करुणा शर्मा नरमल्या; माध्यमांच्या प्रश्नांवर म्हणाल्या..

Published On: 

बीड : गेल्या १६ दिवसांपासून तुरुंगामध्ये असणाऱ्या करुणा मुंडे यांना आज न्यायालयाने दिलासा दिला आहे. करुणा मुंडे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा मुंडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाने आज दिला आहे. करुणा शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे.

न्यायालयीन कोठडी नंतर दुपारच्या सुमारास करुणा यांना कारागृहातून सोडण्यात आले. बाहेर आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी ‘नो कमेंट्स’ असे उत्तर देत बोलण्यास नकार दिला. यानंतर त्या गाडीत बसून निघून गेल्या. करुणा शर्मा प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. शर्मा कारागृहाच्या बाहेर आल्यावर काय बोलणार ? हे पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. मात्र आज शर्मा यांनी कारागृहाबाहेर आल्यावर मीडियाच्या प्रश्नाला नो कमेंट्स म्हणत एकप्रकारे बोलण्यास नकार दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या, अनेकांचा भांडाफोडसाठी येत असल्याचे जाहीर करणाऱ्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा दि. ५ सप्टेंबर रोजी परळीत दाखल झाल्या. दरम्यान, त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

न्यायालयीन कोठडीतून जामीन मिळाल्यानंतर आज त्या तुरुंगातून बाहेर आल्या. पण यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधणे टाळले. एकवेळ अशी होती की, खास माध्यमांशी संवाद साधण्यासाठी त्या परळीत आल्या होत्या. मात्र, आज स्वत:हून पत्रकार त्यांच्याशी बोलण्यास इच्छूक असताना करुणा यांनी मौन बाळगणे पसंत केले. यावरून करुणा शर्मा नरमल्या असल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!