Share

कोरोना नियमांना हरताळ ; शरद पवार, दिलीप वळसे पाटलांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी

Published On: 

पुणे : संपूर्ण देशावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. सर्वसामान्य जनतेने कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सरकारने घातलेले नियम स्वीकारले यामुळे अनेक संकटाना देखील जनतेला सामोरे जावे लागले असल्याचे पहायला मिळाले. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारधील नेते, मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन जनतेला करत आहे.

तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. म्हणून राज्य सरकार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि महत्वाचे नेतेच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन कराताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते.

यावेळी सभागृहामध्ये प्रचंड गर्दी असल्याचे पहायला मिळाले. यावेळी शरद पवार म्हणाले की, कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लोकांना भेटणं टाळायला हवं. असे सल्ले आम्हाला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेत. पण काळे यांचा संकल्प होता. म्हणून आम्ही आलो. व्यासपीठ आणि समोरची गर्दी अंतर ठेवून आम्ही कार्यक्रम करु असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणून मी यायचं ठरवलं, असं पवार म्हणाले.

तर दुसरीकडे काल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे खेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच पक्षातील आणि सरकारमधील लोकांना मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा आणि नियमांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!