🕒 1 min read
पुणे : करुणा मुंडे यांनी स्वताच्या ‘शिवशक्ती सेना’ या नवीन पक्षाची स्थापणा केली आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत समाजसेवी लोकांना पक्षात येण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली. ‘एकीकडे राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तर दुसरीकडे आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.’ याबाबत विचारले असता करुणा मुंडे यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या, “हा जो कोरोनो-वोरोना आहे. माझ्याजवळ कामगार संघटनेचे लाेक, शिक्षाकर्मी या सर्वांचे निवेदन आहे. स्थानिक पातळीवर या लोकांना भयंकर अडचनी आहेत. आझाद मैदानावर देखील अनेक लोक आंदोलन करत आहेत, यांच्यावर दबाव आणण्यासाठी कोरोना आहे. मला सरकारला विचारायचे आहे. जर कोरोना आहे तर कोरोना सहा महिन्यासाठी कुठे जातो आणि परत कुठून येतो?”
“जसे एचआयव्ही पॉझिटीव्ह, कॅंसर सारखे आजार आहेत ते कुठं येत-जात नाहीत. मात्र कोरोना अशी कोणती गोष्ट आहे जी जाते आणि सहा महिन्यानंतर परत येते. सहा महिन्यासाठी कोरोना कुठे जातो या एका प्रश्नाचे उत्तर मला सरकारकडून हवे आहे,” असे करुणा मुंडे म्हणाल्या.
संपुर्ण जगात कोरोना आहे, तुम्हाला यावर विश्वास नाही का?, यावर करुणा मुंडे म्हणाल्या, “मी तेवढेचं बोलू शकते जेव्हढे मला नॉलेज आहे. मी डॉक्टर नाही, मी डब्ल्यूएचओ मधील देखील नाही. सरकार कोरोनाचे कारण सांगत बाजूला होते. मात्र सर्व लोक कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहेत. त्यामुळे कोरोनासोबत जगायची आपल्याला सवय करावी लागेल. सरकार पाच किलो गहू, तांदूळ देऊन बाजूला होईल. येवढ्यात कोणाचे घर चालेल. उद्धव ठाकरे यांनी मला पाच किलो गहू, तांदूळात घर चालवून दाखवावे”, असे करुणा मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
- “उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांविरोधात एफआयआर दाखल करावा, तेव्हा मी…”; करुणा मुंडेंचे आव्हान
- “चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं”, राऊतांचा हल्लाबोल
- नेत्याचा मुलगा म्हणून तिकीट मिळत नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना उत्पल पर्रीकरांचा सवाल; म्हणाले, ‘गुन्हेगारांना तिकीट देता मग..’
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर राऊतांचे भाष्य; म्हणाले,‘कधी काळी पंतप्रधानही…’
- “…औकात असेल तर करून दाखवा”, भातखळकरांचे संजय राऊतांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
