🕒 1 min read
मुंबई – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे दि. ५ सप्टेंबर रोजी परळीत दाखल झाल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावरच गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. करुणा मुंडे यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून जामिनावर सुटका झाली आहे.
सुटका झाल्यानंतर त्यांनी त्यावेळी माध्यमांशी बोलणे टाळले होते मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा फेसबुकवर लाइव्ह करत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. माझ्या नावाचा उल्लेख करुणा शर्मा असा न करता माझ्या पतीच्या आडनावाने म्हणजेच करुणा धनंजय मुंडे असा करावा अशी माध्यमांना विनंती केली आहे. याबाबत अधिक बोलताना त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी हायकोर्टात लेखी दिले आहे की मी त्यांची १९९८ पासून पत्नी असून आम्हाला दोन मुलं देखील आहेत. त्यामुळे माझ्या नावाचा उल्लेख करुणा शर्मा असा न करता करुणा धनंजय मुंडे असा करावा अशी विनंती करत आहे.
त्या म्हणाल्या, पतीचे नाव किंवा आडनाव हा स्त्रीसाठी एक स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट असते. मी जर रखेल किंवा बाजारू बाई असते तर मी ही लढाई लढले नसते. यामुळेच मी लाइव्ह आले असून गेल्या ८-९ महिन्यांपासून माझी ही लढाई सुरु आहे. माझ्यावर माझ्या पतीने कोर्टाद्वारे काही निर्बंध आणले असल्याने मी माध्यमांमध्ये बोलू शकत नाही. ते केस करून गप्प बसले आहेत. ना ते ही केस पुढे नेत आहेत ना ते मागे घेत आहेत. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहेत. माझ्या पतीनेच न्यायालयात हे मान्य केले आहे की मी त्यांची पत्नी आहे. आणि त्यांच्यापासून मला दोन मुलं आहेत.
पोलीसदेखील माझ्यावर जेव्हा गुन्हा दाखल करत होते तेव्हा ते करुणा शर्मा या नावानेच गुन्हा दाखल करत होते त्यावेळी मी त्यांना सुद्धा हे समजावून सांगितले की, केस करायची असेल तर जरूर करा मात्र नाव तरी बरोबर लिहा. पुन्हा जे होईल ते सर्व तुमच्यावरच येईल. पोलीस बंधूना देखील माझी विनंती आहे की कुणावरही खोटी केस दाखल करू नका. मग पुढे त्यांनी केस दाखल करताना करुणा मुंडे असा उल्लेख केला असं त्यांनी म्हटले आहे.
माझे पती जर चुकीच्या मार्गावर जात असतील तर त्यांना त्या मार्गावर जाण्यापासून रोखणे माझे कर्तव्य आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला याचे मला दुखः नाही माझ्यावर हा गुन्हा कुणी दाखल केला त्याचं मला वाईट वाटते. माझ्यावर कुणी खोटा गुन्हा दाखल केला हे सर्वाना माहिती आहे. एखादा व्यक्ती असा कसा वागू शकतो. मी याचा विचारही करू शकत नाही असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खानला दिलासा नाहीच; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- … तर एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्स आयपीएलमधून पडू शकते बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

