Share

जावेद अख्तर यांनी तीन दिवसांत माफी मागितली नाही तर घरात घुसून मारू : करणी सेना

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : श्रीलंकेत बुरखाबंदी झाल्यावर भारतात देखील बुरखाबंदी करावी अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या होत्या. प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी बुरखा घालण्याच्या प्रथेचे समर्थन केले होते. पण हे समर्थन करताना भारत सरकारने बुरखा आणि राजस्थानमधील घूंघट या दोन्हींवर बंदी घालावी, अशी मागणी अख्तर यांनी केली होती.

जावेद अख्तर यांच्या या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून आता या वादात करणी सेनेने उडी घेतली आहे. राजस्थानी घुंघट प्रथेविरोधारात आवाज उठवणाऱ्या जावेद अख्तर यांनी माफी मागावी अन्यथा परिणाम भोगण्यास तयार व्हावं असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेनं दिला आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी जावेद अख्तर यांना तीन दिवसांत माफी मागावी नाहीतर परिणाम वाईट होतील अशी थेट धमकी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले जीवन सिंह सोलंकी ?

‘जावेद अख्तर यांनी राजस्थानच्या संस्कृतीवर बोट दाखवू नये. जावेद अख्तर यांनी तीन दिवसांत माफी मागावी अन्यथा परिणाम भोगायला तयार राहावे. करणी सेनेला अशा लोकांना कसं उत्तर द्यायचं हे चांगलं ठावूक आहे. वाटल्यास अख्तर यांनी संजय लीला भन्साळी यांना विचारावे. जर कोणी राजस्थानाच्या संस्कृतीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचे डोळे फोडण्यासही आम्ही मागे पुढे पाहणार नाही. जावेद अख्तर यांनी तीन दिवसांत माफी मागितली नाही तर घरात घुसून मारू’ .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!