मुंबई: स्टार किडमध्ये तैमूर हा हॉट फेव्हरेट मुलगा आहे. तैमूरच्या जन्मापासूनच सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये तो चर्चेत असतो. तैमूरचा नवा फोटो समोर आल्यास तो व्हायरल होण्यास वेळ लागत नाही हे आता सर्वश्रुत झाले आहे. मात्र आता याच तैमुरला टीव्ही पाहण्याचे व्यसन लागू नये म्हणून करीना आणि सैफ खास काळजी घेत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत एका मुलाखतीत करीनाने हा खुलासा केला आहे.तैमूर जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत मला आणि सैफला टीव्हीही पाहता येत नाही हा खुलासा करीना कपूरने स्वतः केला आहे.
आम्ही तैमूर झोपल्याशिवाय टीव्हीच बघत नाही. तैमूर दिवसभर मस्ती करतो, त्याला टीव्हीची सवय लागू नये म्हणून सैफ आणि मी तो झोपल्यावरच टीव्ही पहातो असे करीनाने सांगितले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

