🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या फिटनेसची नेहमीच काळजी घेत असते. नुकतेच तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिचे वजन अधिक वाढले होते. त्यानंतर आता तिने स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यांचं दिसत आहे. नुकताच करीनाने सोशल मिडियावर एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे, ज्यात ती अतिशय फिट दिसत आहे. त्यामुळे करीना स्वतःला पुन्हा एकदा पुर्वीसारखीचं स्लिम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/CPnWIOWJTAU/?utm_source=ig_embed&ig_rid=d4728c96-fcab-426e-938e-ae9a7b3ee324
तैमुर या त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म २०१६ साली झाला, त्यावेळीही करीनाचं तब्बल २५ किलो वजन जास्तीने वाढल्याचंही ती म्हणाली होती. त्यामुळे तेव्हाही करीनाने मुलाच्या जन्माच्या महिन्याभरानंतर तिने व्यायाम सुरू केला आणि काही दिवसांतच तिने संपूर्ण वाढलेलं वजन कमी केले होते. यावेळीही ती असच करताना पाहायला मिळत आहे.
करीना प्रेग्नंसी काळातही प्रेग्नंसी योगा करत होती. त्याचे अनेक फोटोही तिने शेअर केले होते. करीना आताही कठोर मेहनत घेऊन स्वतःला फिट ठेवत आहे. ती नेहमीच फिटनेस संबधी फोटो, व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असते. घरीच व्यायाम देखील करत आहे. सध्या सोशल मीडियावर ती फार सक्रिय आहे. तसेच कोरोना काळ असल्यामुळे यावेळी काय आणि कशी काळजी घेतली पाहिजे हे देखील ती सोशल मीडियाद्वारे सांगत असते.
महत्त्वाच्या बातम्या
- इथे पैसे दिल्या शिवाय कामेच होत नाहीत; भूमी अभिलेख कार्यालय लाचखोरांचे!
- ‘धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची इच्छा’ ; चहलचे मोठे विधान
- धक्कादायक! भारताच्या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा पोलीस अधिकाऱ्यावर अत्याचाराचा आरोप
- आ.मेटेंची ग्वाही फक्त नावालाच, मोर्चाच्या सुरुवातीलाच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर; ‘बॉल टेम्परिंग’ प्रकरणात केली ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
