🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- बहुचर्चित हिंदी ‘सैराट’ सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या सिनेमाचा पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे.सैराटच्या या यशाने फक्त मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही भुरळ घातली.हा सिनेमा 6 जुलै 2018ला आपल्या भेटीला येणार आहे.

या सिनेमाचं नाव ‘धडक’ असं ठेवण्यात आलं आहे. आर्चीच्या भूमिकेत श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि परशाच्या भूमिकेत शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर या सिनेमात झळकणार आहे.शशांक खेतान ‘धडक’ या सिनेमाचं दिग्दर्शिन करणार आहे. ‘झी स्टुडिओ आणि धर्मा प्रोडक्शन’ निर्मित हा सिनेमा प्रेक्षकांवर काय जादू करतो हे पाहणं आता महत्वाचं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

