Share

‘श्रीमंतीची झिंग’ सांगणाऱ्या ‘कंदिल’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Published On: 

मुंबई : १९व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झालेल्या ‘कंदिल’ या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाने देश-विदेशातील अनेक चित्रपट महोत्सवात हजेरी लावणार आहे. महेश कंद नावाच्या नवोदित दिग्दर्शकाने हा चित्रपट प्रदर्शित केला आहे.

नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या मोशन पोस्टरला कंदीलाची पार्श्वभूमी दिसत आहे. तसेच या पोस्टरमध्ये पाच तरूण दिसतात. हे तरुण झाडाखाली असलेल्या दगडावर बसलेले आहेत. तर एक तरूण झाडाला टेकून तर दुसरा हाताची घडी घालून शुण्यात नजर रोखून उभा आहे. ‘श्रीमंत… श्रीमंत’ असे बोल असलेल्या गिताच्या (मुखडयाची) संगीतमय जोड या पोस्टरला देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/COuJbdwnE6s/

‘हातात घेऊन सपनाची भिंग, निघाले बघाया सशाचे शिंग, पोरांना चढली श्रीमंतीची झिंग’ या वनलाइन वर चित्रपटाचे कथानक आधरीत आहे. श्रीमंत होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि तो प्रवास घेउन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महेश कंद, लक्ष्मण साळुंके, विनोद खुरंगळे, मंदार फाकटकर, दिव्यराज ओव्हाळ, दिलीप अष्टेकर आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटातील काही गाणी ही नंदेश उपम यांनी स्वरबद्ध केली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!