🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत श्रीलंका यांच्यात मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने भारतीय माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादी कपिल देव यांना मागे टाकत दुसरा क्रमांक गाठला आहे. त्याच्या नावावर एकूण ४३६ कसोटी विकेट्स झाल्या आहेत.
त्याच्या या विक्रमावर कपिल देव यांनी प्रतीक्रिता दिली आहे. मिड डे च्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, “माझा विक्रम त्या खेळाडूने तोडला आहे ज्याला खेळण्यास जास्त संधी मिळाली नाही. जर त्याला इंग्लंड विरुद्ध संधी दिली असती तर त्याने त्यावेळीच माझा विक्रम मोडला असता. आता त्याने 500 विकेट्स घेण्याच्या टारगेटकडे पाहायला हवे. मी त्याच्यावर खूप खुश आहे. जास्त संधी न मिळतही त्याने हा विक्रम केला.”
भारताकडून कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त विकेट अनिल कुंबळे यांच्या (६१९) नावावर आहेत. अश्विनने मोहाली कसोटीत पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. भारत श्रीलंका दुसरा सामना १२ मार्च पासून खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
