मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला आज सकाळी सुरुवात करण्यात आली होती. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं आहे. यानंतर कंगना रणौत भावुक झाली असून, तिने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर घणाघात सुरूच ठेवला आहे.
कंगना रणौतच्या कार्यायावरील अचानक झालेली ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने केली जात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे कंगनाच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून आता हे तोडकाम तात्पुरते स्थगित केल्याचे समजते. तर, महापालिकेचे कर्मचारी देखील साहित्य व जेसीबी घेऊन रवाना झाल्याचे समजते.
त्यामुळे, मुंबई महानगरपालिकेच्या आडून कंगनाच्या कार्यालयावर करण्यात येत असलेली कारवाई थांबवण्यात आली असून उद्या दुपारी ३ वाजता कोर्टात याबाबत बीएमसी तसेच कंगनाची बाजू ऐकून घेतली जाईल असे समजते. दरम्यान, कंगनाच्या बाजूने भाजप ठाम असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटवरून देखील दिसून आले आहे. मुंबई मध्ये अनेक अनधिकृत बांधकामे असून अनधिकृत झोपडपट्टयांना महापालिकेच्याच्या अधिकाऱ्यांसह सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा वरदहस्त आहे का? कंगनाने गेल्या काही दिवसात मुंबई पोलीस व व्यवस्तेबाबत आवाज उठवल्यानंतरच ही नोटीस काढल्याने सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत असून उत्तरं कोण देणार? असा देखील मुद्दा आता निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या:-
निलंगा शहरातील मुख्य रस्त्यांची चाळ
कंगनाच्या कार्यालयावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती!
कंगना मुंबईत दाखल, विमानतळाबाहेर राडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

