मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत कोणालाही लक्ष्य करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. कंगना नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत सर्वांनाच वेठीस धरते. कंगना सध्या राजकीय घडामोडींमध्ये बरीच सक्रिय दिसत आहे. महाराष्ट्र्रत चालू असलेल्या घडामोडींवर कंगना नेहमीच ट्विट करत आहे. नुकतेच असेच एक ट्विट कंगनाने केले ते सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये कंगनाने पाकिस्तानचे कौतुक केले आहे.
देशभरात कोरोनाने उद्भवलेली परिस्थिती चिंताजनक आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. यातच कोरोनाचा सामना करण्यासाठी शेजारचा देश पाकिस्तान आपल्या देशाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. सध्या ट्विटरवर #PakistanStandsWithIndia हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. यावर प्रतिक्रिया देत कंगनाने ट्विट केले, ‘पाकिस्तानच्या ट्विटरवर टॉप ट्रेंड होणार हॅशटॅग #PakistanstandswithIndia पाहून आनंद झाला. भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो.’ या ट्विट मधून कंगनाने पाकिस्तानचे कौतुक केले आहे.
Heartwarming to see top trend from Pakistan #PakistanstandswithIndia #भारत_का_वीर_पुत्र_मोदी provided the country with vaccine nice to see them appreciate his kindness and reciprocate with love, we too acknowledge their empathy in these testing times #भारत_का_वीर_पुत्र_मोदी
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 24, 2021
दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर याने भारतीयांसाठी प्रार्थना केली आहे. ‘भारतासाठी सध्याचा काळ हा मुश्कील काळ आहे. इथे दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे तर कित्येक जणांना औषधोपचार न मिळाल्याने जीवाला मुकत आहेत. मी अशा सर्व भारतीयांसाठी अल्लाहकडे दुवा मागतो. या सर्व परिस्थितीशी झुंजण्यास भारतीयांना बळ मिळो, अशी प्रार्थना करतो तसंच पाकिस्तान सरकारकडेही मी आवाहन करतो की भारताला ऑक्सिजनचा पुरवठा करुन मदत करावी’, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून कडा या गावात वापरली ‘ही’ पद्धत
- तांदुळाचा काळाबाजार करणाऱ्याला अटक, २३ क्विंटल तांदूळ जप्त
- …म्हणून अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय लावली आहे; जयंत पाटील यांचा अजब दावा
- राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार – अजित पवार
- ‘सर्वांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार अखंड कार्यरत आहे’


