Share

मुंबई पोलिसांच्या सलग तिसऱ्या समन्सला कंगणाने दाखवली केराची टोपली?

Published On: 

मुंबई : हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणी कंगणाची चौकशी केली जाणार आहे कंगणाचे ट्विटर कोण चालवते? का कंगणा स्वतः ट्विट करते, या बाबत आता चौकशी केली जाणार आहे. कंगणा सोबतच बहिण रंगोली हिची देखील चौकशी केली जाणार. कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे, दरम्यान याबाबत चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी समन्स बजावले होते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला आज (23 नोव्हेंबर) वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, यावेळीही कंगना अनुपस्थितीत राहणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, या प्रकरणी आता कंगना हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते.

मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा ‘फायनल अल्टीमेटम’ असून, आताही कंगना अनुपस्थितीत राहिल्यास तिला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!