Share

तापसी-अनुराग प्रकरणात कंगनाची उडी म्हणाली ; “मला पहिल्यापासूनच…”

Published On: 

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे.या चौकशीदरम्यान या दोघांशी संबंधीत ऑफिसेस आणि मालमत्तांवर इनकम टॅक्स विभागाकडून छापे टाकण्यात आलेत. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांमधील एकूण 28 ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे.

अनुराग कश्यप सोबतच निर्माता विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना यांच्यावरही कारवाई सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींच्या घोळ असल्याचं समोर आलं आहे.अभिनेत्री तापसी पन्नूने पाच कोटींची रोख रक्कम घेतल्याचे पुरावे आढळले आहेत. आता याचा पुढील तपास सुरू आहे. २०११ ते २०१८ या वर्षांतील करचुकवेगिरी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आता या प्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनंही उडी घेतली आहे.

कंगना रणौतनं एका न्यूज पोर्टलच्या बातमीची लिंक शेअर केली आहे. “आयकर विभागानं दावा केलाय की त्यांनी फोनमधील डेटा साफ केला आहे. मनी लाँड्रिंग आणि त्यातील हिस्सा असलेल्या भागीदारीचा आकडा आश्चर्यकारक असून शकतो,” असं त्यावर तिनं लिहिलं आहे. “मला पहिल्यापासूनत त्यांच्यावर संशय होता जेव्हा महागड्या राष्ट्रविरोधी जाहिरातींमधून त्यांना प्रवासी मजुरांना चिथावणी देताना पाहिलं होतं,” असंही तिनं नमूद केलं आहे.

“डेटा परत मिळवला जाऊ शकतो. परंतु हे सर्व छोटे खेळाडू आहेत. कोणी केवळ कल्पनाच करून शकतो की या क्षेत्रात दहशतवाद किती आतपर्यंत आपली मुळे रोवून बसला आह आणि पैशासाठी भारताला कशाप्रकारे तोडत आहे. सरकारला सर्वांसाठीच एक चांगलं उदाहरण सादर करावं लागेल. ते दहशतवादासाठी देशाचे तुकडे करून विकू शकत नाहीत, जय हिंद,” असही कंगना म्हणाली.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!