🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या विजयासह हैदराबादने प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र, हा सामना संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी हैदराबादच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार आणि अनुभवी किवी फलंदाज केन विल्यमसन उर्वरित हंगामासाठी उपलब्ध होणार नाही.
विल्यमसन न्यूझीलंडला परतत असल्याचे फ्रेंचायझीने सांगितले. ”आमचा कर्णधार केन विल्यमसन न्यूझीलंडला परतण्याच्या मार्गावर आहे कारण त्याच्या कुटुंबात एक नवीन सदस्य जोडला जाणार आहे. आमच्या कॅम्पमधील प्रत्येकजण केन विल्यमसन आणि त्याच्या पत्नीला सुरक्षित प्रसूतीसाठी शुभेच्छा देत आहे”, असे संघाने सांगितले.
???????????????????????????????? ????????????????????????:
Our skipper Kane Williamson is flying back to New Zealand, to usher in the latest addition to his family. ????
Here's everyone at the #Riser camp wishing Kane Williamson and his wife a safe delivery and a lot of happiness!#OrangeArmy #ReadyToRise pic.twitter.com/3CFbvN60r4
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 18, 2022
सलग दोन पराभवांसह मोसमाची सुरुवात करणाऱ्या हैदराबादने शानदार पुनरागमन करत आपले पुढील ५ सामने सलग जिंकले. प्ले-ऑफमध्ये ते आरामात आपले स्थान पक्के करतील असे वाटत होते. मात्र, त्यानंतर खेळल्या गेलेल्या पुढील पाच सामन्यांमध्ये सलग पराभव झाल्याने त्यांची प्ले-ऑफमध्ये जाण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. हैदराबादचा या मोसमात आणखी एक सामना शिल्लक आहे आणि प्ले-ऑफसाठी पात्र होण्यासाठी त्यांना इतर संघांच्या निकालावर तसेच तो सामना जिंकण्यावर अवलंबून राहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
