Share

किती मंत्र्यांची मुलं सैन्य दलात भरती होतात? नक्षली हल्ल्यानंतर कन्हैय्याकुमारची शाह यांच्यावर टीका

Published On: 

नवी दिल्ली – छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बीजापुर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत 22 जवान शहीद झाले. आणि 31 अन्य जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचा दौरा केला.यावेळी शहा यांनी यावेळी सांगितले कि, ‘नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना सरकार आणि देशातली सर्व नागरिकांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आज आम्ही या प्रकरणावर बैठक केली आहे. मी देशावासियांना आश्वासन देतो की, ही लढाई थांबणार नाही उलट आणखी तीव्र होईल’.

दरम्यान,यानंतर कम्युनिस्ट पार्टीचा नेता कन्हैय्याकुमारने आपल्या ट्विटमध्ये अमित शहांना लक्ष्य केले आहे.केवळ शेतकऱ्याचाच पोरगा सैन्यात दाखल होतो तर ज्याचे वडिल गृहमंत्री आहेत, त्यांचा मुलगा बीसीसीआयचा सचिव होतो,असे म्हणत शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. निर्लज्ज सत्ताधाऱ्यांना विचारायला हवं, किती मंत्र्यांची मुले सैन्य दलात भरती होतात? भ्याड नक्षली हल्ल्यात देशातील सर्वसामान्य लोकांचा रक्त सांडतं अन् खुर्चीवर असलेले याचा फायदा घेत असतात. देशातील जनतेला हे कटकारस्थान समजायला हवं. देशातील वीर जवानांना आणि शेतकऱ्यांना नमन ! असे ट्विटर कन्हैय्या कुमारने केलं आहे.

दरम्यान,सुरक्षा यंत्रणा मोस्ट वाँटेड नक्षलवाद्यांच्यी यादी बनवून त्यांच्याविरोधात लवकरच मोठी कारवाई सुरू करणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, ऑपरेशन प्रहार-३ च्या अंतर्गत तरुणांचे ब्रेनवॉश करून आपल्या बाजूने वळवणाऱ्या नक्षलवाद्यांना लक्ष्य करण्यात येणार आहे.
नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर्सची यादी बनवण्यात आली आहे. यामध्ये पीएलजीए-१ चा सर्वात मोठा कमांडर हिडमा याचा समावेश आहे. त्याच्यासोबत कमलेश उर्फ लछू, साकेत नुरेटी, लालू दंडामी, मांगेसग गोंड, राम जी, सुखलाल आणि मलेश यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!