Share

कल्याण मटका खेळविणारा गुन्हेशाखेच्या जाळ्यात

Published On: 

औरंंगाबाद : कोऱ्या कागदावर आकडे लिहुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळविणाऱ्या मोहमंद शोहेब मोहंमद खलील (वय २५,रा.गवळीपुरा,छावणी) याला गुन्हेशाखा पोलिसांनी जेरबंद केले.

ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मिलिंद महाविद्यालयाजवळील झुणका-भाकरकेंद्राजवळ करण्यात आली. मोहमंद शोहेब याच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. कोरोना काळात शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून चोरी, घरफोडी, वाहनचोरी, मंगळसूत्र चोरी यांसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आवाहन असताना गुन्हे शाखेकडून हि कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!