Share

शहरातील रस्त्यांची कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा, पालकमंत्र्यांनी टोचले मनपाचे कान

Published On: 

औरंगाबाद : शासन अनुदानीत शहरी सडक योजनतंर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या १५२ कोटी व १०० कोटी निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत. तसेच शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (दि.२५) केल्या.

यावेळी देसाई म्हणाले की, शहरात विकास कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये. याकरिता महानगरपालिका अंतर्गत सर्व विकास कामे विहित मुदतीत व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. यावेळी मनपा आयुक्त पाण्डेय यांनी शासन अनुदानित शहरी सडक योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महानगरपालिकेच्या निधीतून सुरु असलेल्या रस्ते कामांची माहिती दिली.

एमआयडीसीच्या निधीतून ६० टक्के कामे, एमएसआरडीसी तून ३० टक्के कामे, तर मनपाची ४० टक्के रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहे. विशेष बाब म्हणून मनपाच्या हिश्याचे ५०.५७ कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी शासन मूलभूत सोई सुविधातंर्गत अनुदान देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शहर अभियंता पानझडे यांनी विकास कामांची माहिती दिली.

पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी पालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी पालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस.डी.पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह इतर सर्व प्रमुख यंत्रणाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!