हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीतील भाटेगाव येथे स्वच्छतागृह बांधकामासाठी ३ लाख ८४ हजार रुपयांचा चेक देण्यासाठी सहायक लेखाधिकाऱ्याने लाच घेतली होती. त्या प्रकरणाच्या चौकशीमध्ये गटविकास अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कळमनुरीचा गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी याला अटक केली आहे.
भाटेगाव येथे स्वच्छतागृह बांधकामासाठी ३२ लाभार्थींचा ३ लाख ८४ हजार रुपयांचा निधी देण्यासाठी पंचायत समितीचा सहायक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे याने ७ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामध्ये ५ हजार रुपये गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी याच्यासाठी, तर २ हजार रुपये स्वतःसाठी असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर कळमनुरी पंचायत समितीच्या परिसरात १५ जुलै २०२० रोजी दुपारी शिंदेला लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने तपास सुरू केला. यात खिल्लारीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एसीबीने खिल्लारी याला कळमनुरी येथून अटक केली. त्याला हिंगोलीच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- शेतकरी आंदोलनात फूट पडल्यामुळे या लढ्याला काही अर्थ उरला नाही : नरेश टिकैत
- ऑस्ट्रेलियामधील वर्णभेद घटनेनंतर इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- सलग चौथ्या वर्षी मालमत्ता करवाढ न करण्याचा आयुक्ताचा निर्णय
- कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष करणार; निलेश राणेंची सिंहगर्जना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

