🕒 1 min read
औरंगाबाद : दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांचा ऐतिहासिक विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत महाविकास आघाडी सरकारचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. शिवसेना उमेदवार कलाबेन यांनी नुकत्याच झालेल्या निवडणूकीत बाजी मारली आहे. याविषयी चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने या लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना तिकिट देण्यात आले. तर भाजपाकडून महेश गावित तर काँग्रेसकडून महेश धोदी यांना तीकिट देण्यात आले होते. या निवडणुकीत तिरंगी लढत बघायला मिळाली. त्यात शिवसेना उमेदवार कलाबेन यांनी बाजी मारली आहे.
दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर जी यांचा ऐतिहासिक विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे.
अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत महाविकास आघाडी सरकारचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे. pic.twitter.com/pOeceLN0SY
— Satish Chavan (@satishchavan55) November 2, 2021
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीत सहभाग घेत अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या. तसेच भाजपाकडून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला, महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. डेलकर यांच्या या विजयाने महाविकासआघाडीत चैतन्य संचारले असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’
- तेजश्रीने लेटेस्ट फोटो शेअर करताच चाहत्यांच वेधले लक्ष
- संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला ‘हा’ लाखमोलाचा सल्ला
- आरोप-प्रत्यारोपाच्या धुराळ्यात अमृता फडणवीसांनी लक्ष्मीमातेला घातले ‘हे’ साकडे
- ‘महागाई शिगेला पोहोचली आहे, मोदी सरकारकडे जनतेसाठी…’, राहुल गांधींनी व्यक्त केली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
