🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत एक ट्विट केले आहे. ‘आओ दिवाली के पर्व पर दिया जलाये – झूठ और षडयंत्र से लाये गये उदासी के सबब को दूर भगाये!’ असे अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे. माझ्याविरोधात रचल्या गेलेल्या खोट्या षडयंत्रामुळे आलेली उदासी दूर होवो, असे साकडे अमृता फडणवीसांनी लक्ष्मीमातेला घातले आहे.
आओ #Diwali के पर्व पर दिया जलाए – झूठ और षड्यंत्र से लाए गए उदासी के सबब को दूर भगाए ! #diwalivibes #Diwaliwishes #Diwali2021 pic.twitter.com/616ghBi3TU
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 3, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला होता. यावरुन नवाब मलिक यांना अमृता फडणवीस यांनी चांगलेच सुनावले होते.
अमृता फडणवीस मलिकांना उत्तर देताना म्हणाल्या होत्या, “मी परत एकदा सागंते माझ्यावर तुम्ही जे आरोप करत आहात आणि माझ्या माध्यामातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर, आम्ही स्वतंत्र व्यक्ती आहोत, आमची वेगळी ओळख आहे. मी सामाजिक कार्यकर्ती, बँकर आणि गायिका आहे. मी माझी ही ओळख जपली आहे. जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. कारण, मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि खोट्याची साथ देणाऱ्याला देखील नाही सोडत. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातय, आमच्याकडे असं काहीच नाही जे ते उघड करू शकतात. आमच्याकडे भूखंड, साखर कारखाने असं काहीच नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. असे देखील त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
