🕒 1 min read
नवी-दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात ट्विट करत राहुल म्हंटले आहेत की,’आज दिवाळी आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. हा विनोद नाही. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा आहे.’
दिवाली है।
महंगाई चरम पर है।
व्यंग्य की बात नहीं है।काश मोदी सरकार के पास जनता के लिए एक संवेदनशील दिल होता।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 3, 2021
दरम्यान, यापूर्वी सोमवारी(१ नोव्हें.)राहुल गांधी यांनी पाकिटमारांपासून सावध राहा असं सांगत केंद्र सरकारवर टीका केली होती. तसेच त्यांनी यासोबत #TaxExtortion या हॅशटॅगचा वापर केला होता. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटसह एका बातमीचा हवाला दिला ज्यामध्ये म्हटले आहे की काही राज्यांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १२० रुपयांच्या पुढे गेले आहेत आणि केंद्राने २०१८-१९ मध्ये २.३ लाख कोटी रुपये आणि २०१७-१८ मध्ये २.५८ लाख कोटी रुपये इंधन कर म्हणून जमा केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
