Share

कलाबेन डेलकर शिवसेनेच्या नाहीत, त्यांचा हा जळफळाट; राऊतांचं नारायण राणेंना पुराव्यानिशी उत्तर

Published On: 

मुंबई : दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वाघिणीने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे. यावर शंका घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाही तर अपक्ष उमेदवार असल्याचं वक्तव्य केलं आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी लिहलेल्या अग्रलेखावरुन त्यांच्यावर टीका केली. नारायण राणेंच्या या वक्तव्याला राऊतांनीही पुराव्यानिशी उत्तर दिलं आहे.

देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच. कमला डेलकर निवडून आल्या. त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणतायत. लिखान करताना त्या व्यक्तीला भान नसेल. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होतोय का हे मला माहीत नाही’, असे राणे म्हणाले.

सबसे अलग हुं..पर गलत नही !!! जे सांगतात दादरा नगर हवेली च्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन देलकर शिवसेनेच्या नाहीत… त्यांचा हा जळफळाट आहे..जरा ही भारत निर्वाचन आयोगाची website पहा..शिवसेना जिंदाबाद, असं म्हणत राऊतांनी नारायण राणेंना जोरदार चपराक लगावली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!